PUNE: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक
Updated On:

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी (दि. 24) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील पुणे बाजूने जवळपास 24 कि.मी. अंतरात गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवारी या दोन तासांत वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉइंट येथून पुन्हा द्रुतगती मार्गावर वाहने मार्गस्थ होतील.




