Pune : पुण्यातील सुप्रसिध्द आंबा व्यावसायिक मंदार वसंत देसाई यांचे टपाल तिकीट

पुणे : महान व्यक्ती किंवा समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापण्यासाठी भारत सरकारची जुनी योजना आहे. याच योजने अंतर्गत पुण्यातील सुप्रसिध्द आंबा व्यावसायिक मंदार वसंत देसाई (संचालक, देसाई बंधू आंबेवाले, कोथरूड) यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पोस्ट तिकिट प्रकाशित करून अनोखी भेट देण्यात आली.
पुणे सिटी पोस्टाच्या शताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारच्या या टपाल तिकीट योजने नुसार मंदार वसंत देसाई यांचे हे टपाल तिकीट तयार करण्यात आले. सदर टपाल तिकीट हे पुण्याचे सिटी पोस्ट या मुख्य पोस्ट आॅफीसच्या सहकार्याने, माय स्टॅम्प यावर आधारीत आहे. विशेष म्हणजे इतर टपाल तिकीटांप्रमाणेच देशात कोठेही हे टपाल तिकीट वापरून पत्र पाठविता येते.
या वेळी समीर धर्माधिकारी, पुणे सिटी पोस्ट मुख्य कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्टर संदिप ढवळे आणि त्यांचे सहकारी अभिमन्यू क्षिरसागर हे उपस्थित होते.





