Pune : पुण्यात २ लाख रुपयांचा १३ किलो गांजा जप्त; पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Pune | नुकतेच पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात पुणे शहरातील विविध भागातून कारवाईत जप्त केले आठ कोटी किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत. यानंतर आता पुण्यातील येरवडा भागात गांजाची विक्रीची करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल २ लाख रुपयांचा १३ किलो गांजा जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या गांजा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भवानसिंग बारेला आणि पवन सुभाष बारेला यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करण्यात आला.
पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे शहर पोलिसांनी नऊ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ५७ एन.डी.पी.एस गुन्हयातील जप्त केलेले अंमली पदार्थ मंगळवारी नष्ट केले. यामध्ये गांजा, एम.डी. इफेडीन, कोकेन, एल.एस.डी. चरस, अफिम पॉपीस्ट्रॉ, हेरॉईन व गांजा मिश्रीत बंटा गोळी असा अंदाजे ७ कोटी ७६ लाख १ हजार रुपयांचा ७८८ किलो ९५४ ग्रॅम अमंली पदार्थांचा समावेश होता. हा मुद्देमाल रांजणगाव येथील महाराष्ट्र इनव्हरमेंट पॉवर लिमीटेड कंपनीच्या प्लांटमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.





