Pune : रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही

पुणे : रक्तदानासारखे दुसरे पुण्याचे कार्य नाही. रक्त हे तयार करता येत नाही, त्यामुळे रक्तदान हाच रक्ताचा एकमेव स्रोत आहे. सनी निम्हण सातत्याने शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर घेऊन चांगला संदेश देत असल्याचे सांगत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्याचे कौतुक केले.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पाषाण येथील सोमेश्वर मंदिर प्रांगणात अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी १ हजार १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाला माजी महापौर दत्तात्रय गायकवाड (माजी महापौर), अमोल बालवडकर, भाजपा शहर सरचिटणीस गणेश कळमकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, वसंतराव जुनवणे, शहाजी रानवडे, सुहास निम्हण
सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, ज्ञानेश्वर पारखे, मनोहर आरगडे, शांताराम महाराज निम्हण, पांडुरंगअप्पा दातार, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, सुप्रीम चोंधे, गिरीश जुनवणे, रणजीत कलापुरे, हेरंब शेळके, विशाल शिंदे, सचिन वाडेकर, जयप्रकाश निम्हण, अशोक दळवी, भरत जोरे आदी उपस्थित होते.





