पल्स पोलिओ लसीकरण रविवारी होणार नाही
Updated On:

पिंपरी – शासनाच्या आदेशानुसार रविवारी (दि. 17) पल्स पोलिओ लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. समाज माध्यमांमधून याबाबत नागरिकांमध्ये माहितीही प्रसारित झाली होती. मात्र रविवारचे पल्स पोलिओ लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार प्रदीप हलदार यांनी याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी होणार नाही.
शासनाकडून लसीकरणाची पुढील तारीख जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.





