#INDvENG : कर्णधारपदासाठी बुमराहऐवजी पुजारा हा चांगला पर्याय होता; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले मत
Updated On:

मुंबई – जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी नेतृत्व दिले गेले. मात्र, त्याच्या जागी चेतेश्वर पुजारा हा चांगला पर्याय होता, असे मत माजी कसोटीपटू वसिम जाफर याने व्यक्त केले आहे.
बुमराहकडे गुणवत्ता आहे, पण पुजारा जास्त सरस ठरला असता. 90 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभव कधीही महत्त्वाचाच असतो. बीसीसीआय व निवड समितीने बुमराहकडे नेतृत्व सोपवताना पुजाराच्या ज्येष्ठतेचा विचारच केलेला दिसत नाही.
पुजाराची वैयक्तिक कामगिरी सध्या सरस होत नसली तरीही त्याच्यासारखे खेळाडू एखाद्या खेळीनंतर पुन्हा भरात येऊ शकतात. त्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्चित नाही, असे सांगत बुमराहकडे कर्णधारपद सोपवणे योग्य नाही, असेही जाफरने म्हटले आहे.





