नवरात्रीनिमित्त माहुर गडावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पूजा
Updated On:

नांदेड – आजपासून नवरात्रउत्सवाला सुरुवात झाली असून ठीक ठिकाणी देवीचा गजर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एकपीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर गडावर श्री शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हजेरी लावली. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर ही पहिलीच नवरात्र असल्याने यंदा देवीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार आहे.

यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापणेच्या मुहूर्तावर श्री रेणुका देवीची पूजा करण्यात आली. देवीच्या उत्सवाचा पहिलाच दिवस असल्याने भाविक भक्तांची चांगली गर्दी यावेळी मंदिरात पाहायला मिळाली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,चंद्रकांत भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.






