‘इतिहासाच्या गर्भातील शब्दशिल्पे’ पुस्तक प्रकाशित

इंदापूर : लेखिका पौर्णिमा रणपिसे सावंत लिखित ‘इतिहासाच्या गर्भातील शब्दशिल्पे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा, इंदापूर तालुक्याच्या महिला युवा नेत्या अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. दि.४ सप्टेंबर रोजी लेखिका, कवयित्री ,व्याख्याती पौर्णिमा रणपिसे सावंत यांनी लेखन केलेल्या ऐतिहासिक, सामाजिक,शैक्षणिक बाबींवर दृष्टीक्षेप टाकणारे, ‘इतिहासाच्या गर्भातील शब्दशिल्पे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन युवा नेत्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्तेे पार पडले.
महाराष्ट्रातील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे, विद्यार्थी विषयक व शैक्षणिक लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.अंकिता पाटील ठाकरे यांनी सदर पुस्तकाचे कौतुक केले व पौर्णिमा रणपिसे सावंत यांना पुढील साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
लेखिका पौर्णिमा रणपिसे सावंत या इंदापूर प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या माजी विद्यार्थीनी असून प्राथमिक शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहेत.आतापर्यंत त्यांचे पौर्णिमेचे शब्दचांदणे व चांदणे चारोळ्यांचे हे दोन ई -बुक प्रसिद्ध झाले आहेत.या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ समाजसेविका सौ.यशोधरा विजयकुमार रणपिसे उपस्थित होत्या.





