पुणे -पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मुळीक, सोसायटीच्या अध्यक्ष ऍड. राणी कांबळे-सोनवणे, सचिव ऍड. निवेदिता काळे, संचालक पांडुरंग ढोरे पाटील, ऍड. प्रकाश मासाळ, ऍड. पंडीत धुमाळ, ऍड. राहुलकुमार गुंदेचा, ऍड. दादाभाऊ शेटे, ऍड फैयाज शेख, तज्ज्ञ संचालक ऍड. नरेंद्र जाधव, ऍड. मोहन वाडेकर, ऍड. शारदा वाडेकर, व्यवस्थापक गमे आदी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश धोटे यांनी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक केले. सोसायटीतर्फे 2015 पासून दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. यावर्षी करोना परिस्थितीमुळे दिनदर्शिका प्रकाशित करणे अवघड होते. तरीही अध्यक्ष आणि संचालकाच्या प्रयत्नांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातच प्रथमच महिला चेअरमन म्हणुन निवड झाल्याबद्दल ऍड. कांबळे यांचे कौतुक करण्यात आले. संस्थेस जागा अपुरी पडत आहे, असे संस्थेची पाहणी करताना ऍड. राणी कांबळे-सोनवणे यांनी न्यायाधीश धोटे यांना सांगितले. त्यावेळी धोटे यांनी शिवाजीनगर न्यायालय परिसरात होणाऱ्या नवीन इमारतीमध्ये, तसेच मेट्रोच्या इमारतीसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले.