‘महिमा नागेबाबांचा’ पुस्तकाचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते प्रकाशन

नेवासा (प्रतिनिधी) : भेंडा गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यांचे सचित्र जीवन पट असेलेल्या ‘महिमा नागेबाबांचा’ पुस्तकाचे प्रकाशन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरिजी महाराजांचे हस्ते झाले. भेंडा गांवचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा,संतशिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी दि.३ ऑगस्ट रोजी नागेबाबा मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अशोकराव मिसाळ यांनी अर्पण केलेल्या सव्वातीन किलो वजनाच्या संत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठापणा ही महंत भास्करगिरिजी महाराज यांचे हस्ते नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तिची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. रामयणाचार्य समाधान महाराज शर्मा,दिनकर महाराज मते, अंकुश महाराज कादे,बाळू महाराज कानडे, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,काशीनाथ अण्णा नवले,चित्रकार रवि भागवत,आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे,संतोष मते व्यासपीठावर उपस्थित होते.
नागेबाबा परिवाराने आयोजित केलेल्या या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता मच्छिंद्र महाराज निकम यांचे कीर्तन झाले. शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी नागेबाबा समाधीस अभिषेक करण्यात आला.त्यानंतर सकाळी १० ते १२ यावेळेत रामयणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे किर्तन झाले. त्यानंतर उपस्थित भाविकाना महाप्रसाद देण्यात आला. नागेबाबा पतसंस्थेने राज्यभरातील विविध शाखेंच्या माध्यमातून वाहनातून नगर, बीड, जालना,औरंगाबाद, नाशिक,पुणे जिल्ह्यातील सुमारे १५०० भाविकांना भेंडा येथे आणून नागेबाबांचे दर्शन घडविले.
नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,काशिनाथ नवले,तुकाराम मिसाळ,दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे, बाळासाहेब नवले, देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी तागड,देवीदास गव्हाणे,जलमित्र सुखदेव फुलारी, गणेश गव्हाणे,अशोक वायकर,नामदेव निकम,पंढरीनाथ फुलारी,बापूसाहेब नजन, अंबादास गोंडे,बापूसाहेब नजन, अशोकराव गव्हाणे,गणेश महाराज चौधरी,नागेबाबा पतसंस्थेचे तज्ञ संचालक अमित फिरोदिया,संजय मनवेलीकर,आबासाहेब काळे,सुनील गव्हाणे,अजित रसाळ,राजेंद्र चिंधे,संजय नवले,अड.रविंद्र गव्हाणे,डॉ. लहानु मिसाळ,किशोर मिसाळ यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी परिश्रम घेतले.
ज्ञानेश्वर उद्योग समूह, नागेबाबा पतसंस्था,सर्व नेते मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने नागेबाबा देवस्थानचा विकास होत आहे.या मागे संत नागेबाबा व मीराबाई महाराज मिरीकर यांची प्रेरणा आहे.
भास्करगिरिजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान)श्रीसंत नागेबाबांचे जीवन पट दर्शविणारे “महिमा नागेबाबांचा” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे,आता सद्गुरु किसनगीरी महाराज व ज्ञानेश्वर मंदिराकरिता सर्वस्व अर्पण करणारे वैकुंठवाशी बन्सी महाराज तांबे यांच्या जीवनावर पुस्तक तयार करण्याचा मानस आहे.
कडूभाऊ काळे (संपादक,महिमा नागेबाबांचा)





