‘पीएसआय’ला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Updated On:

अमरावती – गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पीएसआय राजू लेवटकरला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. खरेदीखत मिळवून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
पीएसआय राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी 30 हजार रुपये स्वीकारले होते. त्यानंतर लेवटकर यांनी रोहन भोपळे यांच्या मध्यस्तीने 20 हजार रुपयांची मागणी केली होती. राजू लेवटकर व रोहन भोपळे यांनी तक्रारदारांकडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अरुण सावंत, संजय महाजन, एस.एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.





