Priyanka Chopra : अभिमानास्पद! अॅास्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रा निभावणारी ‘ही’ मोठी जबाबदारी, पोस्ट शेअर म्हणाली…
Priyanka Chopra : चित्रपटसृष्टीतील मानाच्या आणि सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना सन्मानित करण्याची सुवर्णसंधी अभिनेत्री प्रियांका चोप्राला मिळणार आहे.

Priyanka Chopra : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बऱ्याच काळापासून हॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने स्वतःची एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीत तयार केली आहे. ती आणि तिचा पती निक जोनास सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता सोशल मीडियावरून प्रियांकाने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
९८ व्या अकादमी अॅास्कर पुरस्कारांसाठी सादरकर्त्यांच्या यादीत तिच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये “२०२६ अकादमी पुरस्कार.” असे लिहिले आहे. या पोस्टमधून तिने आभार मानले आहेत. प्रियांकासोबत या यादीत रॉबर्ट डाउनी ज्युनियर, अँनी हॅथवे, विल अर्नेट, ग्वेनेथ पॅल्ट्रो आणि पॉल मेस्कल सारखी मोठी नावे आहेत. हे स्टार कलाकार विविध श्रेणींमध्ये विजेत्यांना सन्मानित करतील. ९८ वा अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १६ मार्च रोजी हॉलिवूडमधील ओव्हेशन येथील डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
प्रियांकाने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केल्यानंतर इंडस्ट्रीतील मित्र आणि सहकलाकारांनी तिचे अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये केल्या आहेत. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी “अभिनंदन. तू खरोखरच एक हिरा आहेस.” अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
ऑस्कर पुरस्कार हा जगात सर्वात मोठा चित्रपट सृष्टीतील पुरस्कार समजला जातो. दरवर्षी विविध विभागातून विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यामध्ये दरवर्षी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखकांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. १९२९ मध्ये पहिल्यांदा या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट
प्रियांका एसएस राजामौली यांच्या “वाराणसी” चित्रपटात झळकणार आहे. ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट राजामौली यांच्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातून प्रियांका भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
हेही वाचा : Dhurandhar 2 : अखेर ठरलं.! ‘या’ दिवशी होणार ‘धुरंधर २’चा ट्रेलर प्रदर्शित; स्वतः रणवीरने केला खुलासा





