सकल आंबेडकरी जनतेतर्फे 13 जूनला आक्रोश मोर्चा

नगर – नांदेड येथील बोंडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या राजकीय गावगुंडांच्या व राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल आंबेडकरी जनतेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दि. 13 जून सकाळी 10 वाजता महापालिका कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
यावेळी सुरेश बनसोडे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, संजय कांबळे, रोहित आव्हाड, प्रा. जयंत गायकवाड, आकाश जाधव, सुनील शिंदे, अक्षय भिंगारदिवे, सुशांत म्हस्के, नितीन कसबेकर, योगेश थोरात, सोमा शिंदे, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे आदिसह समस्त आंबेडकरी बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात जातीय व धार्मीक शक्तींनी उच्छाद मांडला असून त्याला संरक्षण व अभय देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकार करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.





