nagar | पटोले यांच्या फोटोला चिखल लावून निषेध

शिर्डी, (प्रतिनिधी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने भरलेले पाय एका कार्यकर्त्यांकडून पाण्याने धुवून घेतल्याने या घटनेचा निषेध म्हणून शिर्डीत भाजयुमोच्यावतीने पटोले यांच्या फोटोला चिखल लावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका पालखी सोहळ्यात गेले असता त्यांनी आपले चिखलाने भरलेले पाय एका कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले. या घटनेचा निषेध म्हणून शिर्डी शहर भाजपा अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या वतीने नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावून निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेणे ही लाजीरवाणी बाब आहे. त्यांनी या कृत्याबद्दल
जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिर्डी शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी केली.
यावेळी भारतीय युवा मोर्चाचे शिर्डी शहर उपाध्यक्ष प्रकाश गोंदकर, भरत जगताप, सागर पवार, प्रवीण शेजवळ, श्याम गायके, सागर जाधव, उमेश काटकर, अविनाश गोंदकर, सागर तायडे, सत्यम दिवेकर, महेश गोंदकर, अशोक विश्वासराव, दर्शन वैद्य, भूषण वर्मा , राजेश रजपूत, पांडुरंग कोते, आकाश आडांगळे, नरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.





