पुणे | कोलकाता येथे घटनेचा राष्ट्रवादी-डॉक्टर सेलतर्फे निषेध
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोलकाता येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक तासाचे मूक आंदोलन करण्यात आले.
“रघुपति राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान’ या प्रार्थनेचे सामूहिक गायन यावेळी करण्यात आले. कोलकाता येथील दुर्देवी घटनेचा तपास सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला असून,
या घटनेची जलद गतीने चौकशी व्हावी आणि नराधमांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी जगताप यांनी केली. यावेळी डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, चंद्रशेखर धावडे, फईम शेख, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.

