Video : बेल्हेच्या मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

Updated On:
Video : बेल्हेच्या मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

बेल्हे – आपल्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हेच्या (ता. जुन्नर) विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून सैनिक बांधवांसाठी पाठवल्या.

रक्षाबंधन तसेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशाचे रक्षण करणाऱ्या 1 हजार जवानांना राख्या पाठवल्या. आपल्या देशाच्या सीमेवर 24 तास उभे राहून आपले रक्षण करणाऱ्या ‘सैनिक बांधवांच्या मनगटात अधिक बळ येऊ दे’ अशी विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली.

या मध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक देखील सहभागी झाले होते. राख्या बरोबर जवानांना पत्र पाठवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. या वेळी प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के. पी. सिंग, पत्रकार रामदास सांगळे, शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ, सीईओ शैलेश ढवळे, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे व सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

2026-10-07 07:40:38

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

2026-10-05 21:10:45

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

शैक्षणिक : फक्त पाठीवर ओझे!

2026-10-05 05:00:00

शैक्षणिक : फक्त पाठीवर ओझे!

Pune : स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी; शालेय परिसरही केला स्वच्छ

2026-10-02 19:07:27

Pune : स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी; शालेय परिसरही केला स्वच्छ