प्राध्यापकांना घरी राहून कामकाजाची मुभा
Updated On:

पुणे – सर्व खासगी व सरकारी शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापकांना दि. 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाम करण्यास मुभा देण्यात आली आहे. तथापि, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू तथा कुलसचिवांनी निर्देश दिल्यास त्यानुसार सर्व प्राध्यापकांना संस्थेमध्ये तातडीने हजर राहणे बंधनकारक आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुटी नाही
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालय तथा तंत्रनिकेतनचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमितरीत्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.





