“मुप्टा’च्या पुणे शहराध्यक्षपदी प्रा.सागर देवकर यांची निवड

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली 25 वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) पुणे शहराध्यक्षपदी प्रा. सागर देवकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट अध्यक्ष प्राचार्य सतीश वाघमारे यांनी देवकर यांना नियुक्तीपत्र देऊन निवड घोषित केली आहे. यावेळी प्राचार्य हनुमंत चव्हाण, पश्चिम महाराष्ट सचिव सय्यद मुस्तफा, पुणे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, डॉ. शिरीष मोरे, डॉ. प्रदीप पाटील, भूषण बहिरमे, प्रा. शब्बीर इनामदार, वाई तालुकाअध्यक्ष प्रा. धैर्यशील पाटील, खंडाळा तालुका अध्यक्ष प्रा. महेंद्र गाढवे आदी उपस्थित होते.
“मुप्टा’ ही संघटना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी काम करते.





