मारुतीच्या हरियाणातील प्रकल्पात उत्पादन सुरू
Updated On:

नवी दिल्ली – मारुती सुझुकी इंडिया कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या हरियाणा येथील खारखोडा येथील प्रकल्पातील उत्पादन सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2022 मध्ये सुरू केली होती. सध्या या प्रकल्पात वर्षाला 2.5 लाख वाहने तयार करण्याची क्षमता आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे आता मारुती सुझुकी इंडिया वर्षाला 26 लाख कार तयार करू शकणार आहे. नव्या प्रकल्पात 18,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक करण्यात येणार असून या प्रकल्पाची क्षमता प्रत्येक वर्षाला दहा लाख युनिट तयार करण्याची होऊ शकेल. हरियाणातील हा या कंपनीचा तिसरा प्रकल्प आहे.





