Vaibhav Viral Post : वैभव सूर्यवंशी पदार्पणापूर्वी अचानक वेगळ्याच कारणाने चर्चेत! ‘त्या’ इन्स्टा रीलने सोशल मीडियावर उडवली खळबळ
Vaibhav Viral Post : आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा करत असलेला वैभव आता मैदानाबाहेरील एका वेगळ्याच सोशल मीडिया दाव्यामुळे अचानक तुफान चर्चेत आला आहे.

Vaibhav Sooryavanshi Insta Reel Post Viral Laila Faisal Abhishek Sharma Rumors : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना रद्द झाला असला, तरी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८९ धावा उभारल्या होत्या. या दौऱ्यात कर्णधार श्रेयस अय्यर आणि उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती १५ वर्षांच्या वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याची. मात्र, आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा करत असलेला वैभव आता मैदानाबाहेरील एका वेगळ्याच सोशल मीडिया दाव्यामुळे अचानक तुफान चर्चेत आला आहे.
काय आहे ‘त्या’ इन्स्टाग्राम रीलचा संपूर्ण वाद?
चाहते वैभवच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत असतानाच, सोशल मीडियावर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका कथित स्क्रीनशॉटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटिझन्सच्या दाव्यानुसार, वैभव सूर्यवंशीने भारतीय सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची कथित गर्लफ्रेंड लैला फैसल हिची एक इन्स्टाग्राम रील आपल्या प्रोफाईलवर रिपोस्ट केली आहे. या संदर्भातील काही कथित स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Bro, Vaibhav Suryavanshi reposted Abhishek Sharma’s girlfriend Leela Faisal’s Instagram reel. 😅
It looked like he was checking her profile and reposted the reel by mistake. pic.twitter.com/6G2TiAaEE4
— Sonu (@Cricket_live247) July 3, 2026
मात्र, ही रील वैभवकडून चुकून रिपोस्ट झाला की मुद्दाम, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. तसेच वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा किंवा लैला फैसल यांच्यापैकी कोणीही अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील या व्हायरल दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
आयपीएल २०२६ चा ‘ऑरेंज कॅप’ विजेता –
वैभव सूर्यवंशी सध्या भयंकर फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने ‘ऑरेंज कॅप’सह अनेक मोठे पुरस्कार जिंकले होते. त्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये त्याने अवघ्या २९ चेंडूंत ९४ धावांची स्फोटक खेळी करत ‘इंडिया ए’ला विजेतेपद मिळवून दिले होते. आयर्लंडविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते, मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी सामन्यांत या १५ वर्षांच्या वादळाला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.





