Pune : सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे : पदवी व पदव्युत्तरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी सुधारित वेळापत्रक राज्य सीईटीने मंगळवारी जाहीर केले आहे. या सीईटीच्या संभाव्य तारखा आहेत, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी राज्य सीईटी सेलने सीईटीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या होत्या. या काही बदल करुन नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी यापूर्वी वेळापत्रकानुसार होणार आहेत.
एमएचटी सीईटी ९ एप्रिल ते १९ एप्रिल रोजी होणार आहे. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी २० ते २१ मार्च रोजी, तर पाच वर्षीय विधीची सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे. तर एमसीएची सीईटी २३ मार्चला, तर एमबीएची सीईटी १ ते ३ एप्रिल रोजी होणार आहे. बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाची सीईटी ३० एप्रिल ते ३ मे या कालवधीत होणार आहे. सविस्तर निकाल राज्य सीईटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पाच वर्षीय विधी सीईटीसाठी नोंदणी सुरू
दरम्यान, सध्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तीन वर्षीय विधी सीईटीसाठी यापूर्वीच नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आता पाच वर्षीय विधी सीईटीची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी अंतिम तारीख २ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ही सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे.





