Pro Kabaddi League 2023 : प्रो कबड्डीत U Mumbaचा UP Yoddhasवर दणदणीत विजय…

Pro Kabaddi League 2023 U Mumba vs UP Yoddhas : प्रो कबड्डी लीग सीझन 10 चा सलामीचा सामना गुजरात जायंट्स आणि तेलुगु टायटन्स यांच्यात 2 डिसेंबर रोजी EKA अरेना, अहमदाबाद येथे खेळला गेला. गुजरातने विजयाची नोंद केली. तर दुसऱ्या सामन्यात यू मुम्बानेसुध्दा यूपी योद्धास हरवून विजयी सुरुवात केली.
प्रो कबड्डी लीग 2023 च्या पहिल्या रात्रीच्या रोमांचक पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सचा 38-32 असा पराभव केला. सोनूच्या सुपर 10 आणि कर्णधाराच्या रणनीतीमुळे तेलुगू दोनदा ऑलआऊट झाला. तर दुसऱ्या सामन्यात यू मुम्बाने यूपी योद्धास 34-31 ने पराभूत केले.
प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या दुसर्या सामन्यात कडवी स्पर्धा पहायला मिळाली, जिथे यू मुंबईचा सामना यूपी योद्धांशी होता. यू मुंबा हा एक अतिशय तरुण संघ होता तर दुसरीकडे यूपी योद्धा स्टार्सने जडला होता.
A tough battle but the 𝐌𝐮𝐦𝐛𝐚 𝐖𝐚𝐥𝐥 was unbreakable tonight 🤜🤛@umumba clinch their first victory of #PKLSeason10 🤩
Stay tuned for more action tomorrow at 7:30 PM onwards, LIVE on the Star Sports Network and for free on the Disney+Hotstar mobile app 📲 pic.twitter.com/76LFOOCiiY
— ProKabaddi (@ProKabaddi) December 2, 2023
प्रदीप नरवाल चांगला खेळ करू शकला नाही आणि बहुतेक सामन्यात त्याला बेंचवर बसावे लागले. सुरेंदर गिलचा स्पेलही चालला नाही आणि यू मुम्बा संघातील आमिर मोहम्मद जफर आणि रिंकू यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे यू मुंबईने त्यांच्या पहिल्या सामन्यात यूपी योद्धास 34-31 असा सहज पराभूत केलं. आमीर मोहम्मदने सामन्यात 11 गुण मिळवले तर रिंकूने 7 गुण मिळवत बचावात आश्चर्यकारक कामगिरी केली.





