Tamil Thalaivas vs U.P. Yoddhas, Pro Kabaddi League 2023-2024 :– प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी तमिळ थलैवाज व युपी योद्धाज या आव्हान जवळपास संपलेल्या दोन संघात लढत झाली. त्यात तमिळ संघाने युपी संघावर ३२-२५ अशी बाजी मारली.
या सामन्याच्या पहिल्या सत्रात तमिळ थलैवाज संघाने मोक्याच्या क्षणी गुण मिळवत आघाडी घेतली. तमिळ संघाच्या नरेंद्रने यशस्वी पकडी केल्या. त्याला साहिल गुलियाने तोलामोलाची साथ देत पहिल्या सत्राच्या अखेरीस २१-१६ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या लढतीत युपी संघाच्या खेळाडूंवर तमिळ संघाने सातत्याने दडपण राखले.
என்னப்பா சந்தோஷமா 🫰
7 புள்ளிகள் வித்தியாசத்தில் யு.பி’ஐ வீழ்த்திய தலைவாஸ் 🫶🏻#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #TamilThalaivas #CHEvUP pic.twitter.com/tTvprHnIj2
— ProKabaddi (@ProKabaddi) February 6, 2024
युपी संघाचे स्टार खेळाडू घगन गौडा व अशु सिंग यांना म्हणावे तसे यश लाभले नाही. याच खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे यंदाच्या मोसमात युपी संघ सातत्याने पराभवाचा सामना करत आहे. या लढतीतही पहिल्या सत्रात हेच चित्र दिसत होते. थमिळ संघाने सर्वबादचेही गुण मिळवताना सर्वोत्तम पकडी केल्या. युपीच्या महिपाल व अनिल कुमार यांना संधी असूनही ते त्याचा लाभ गेऊ शकले नाहीत. त्यांचा सावध खेळच त्यांना मारक ठरला.
#PKLSeason10 (#DELvPUN Match 107) : पुणेरी पलटण ठरला प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ….
या उलट तमिळ संघाने पहिल्या सत्रातील पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याचे दुसरे सत्रही तमिळ संघाच्याच वर्चस्वाचे ठरले. त्यांनी या सत्रात मात्र, आपला बचाव भक्कम करण्यावर भर दि व युपी संघाला गुण मिळणार नाहीत याची जास्त कळजी घेतली. या सत्रातही तमिळ संघाच्या नरेंद्र, हिमांशु होशियार व साहिल यांनीच अफलातून खेळाचे दर्शन घडवले. त्यांच्या खेळासमोर युपी संघाचे खेळाडू पिके पडले. अखेर हा सामना सात गुणांच्या फरकाने तमिळ संघाने ३२ विरुद्ध २५ असा जिंकला.