प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार; रॉबर्ट वाड्रा यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Robert Vadra And Priyanka Gandhi| लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. राहुल यांनी आता वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते रायबरेलीचे खासदार राहतील. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला. यावर प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याचा मला खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
रॉबर्ट वाड्रा एनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, “मी नेहमीच म्हणत आलो की प्रियंका संसदेत गेल्यानंतर मी सक्रिय राजकारणात येऊ शकतो. यावेळीही मी म्हणालो की प्रियंका संसदेत असणे आवश्यक आहे, कारण त्या तसे काम करत आहे. यावेळी प्रियांका यांची मेहनत कामाला आली आहे.”
“मला आशा आहे की प्रियांका प्रचंड बहुमताने विजयी होईल. काँग्रेसला चांगला विजय मिळवून दिल्याबद्दल आणि भाजपला 400-पार घोषणेचे वास्तव लक्षात आणून दिल्याबद्दल मी देशातील जनतेचे आभार मानतो. प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याने मला खूप आनंद झाला आहे. तिथेही त्या खूप मेहनत करतील ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Robert Vadra And Priyanka Gandhi|
राजकारणात येण्याबद्दल रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मला राजकारणात येण्याबद्दल विचारले गेले तेव्हा मी नेहमीच म्हटले आहे की प्रियंका गांधी संसदेत पोहोचल्यानंतर मी सक्रिय राजकारणात सामील होऊ शकेल.” प्रियांका गांधी संसदेत आणि सक्रिय राजकारणात असणे आवश्यक आहे.” Robert Vadra And Priyanka Gandhi|
हेही वाचा:





