Priyanka Gandhi : पाकिस्तानी नेत्याकडून प्रियांका गांधींच कौतुक; ट्विट करत म्हणाला, “असे धाडस…”

Priyanka Gandhi | Pakistan : अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतात इतके प्रभावी आहे की शेजारील पाकिस्तानही त्याचे कौतुक करणे थांबवू शकला नाही. पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांनी सोशल मीडिया एक पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी संसदेत नेलेल्या पॅलेस्टाईन लिहिलेल्या बॅगचे त्यांनी कौतुक केले. प्रियांका गांधी सोमवारी संसदेत पॅलेस्टाईन लिहिलेली खास बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. त्यांच्या या पावलाचे पाकिस्तानात कौतुक होत आहे.
फवाद आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जवाहरलाल नेहरूंसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नातवाकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियांका यांनी आपला स्तर आणखी उंचावला आहे, आजपर्यंत एकाही पाकिस्तानी खासदाराने असे धाडस दाखवले नाही हे लज्जास्पद आहे. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
What else could we expect from a granddaughter of a towering freedom fighter like Jawaharlal Nehru? Priyanka Gandhi has stood tall amidst pigmies, such shame that to date, no Pakistani member of Parliament has demonstrated such courage.#ThankYou pic.twitter.com/vV3jfOXLQq
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) December 16, 2024
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बॅग :
पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबा आणि एकता दर्शविण्यासाठी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी सोमवारी ही बॅग घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या. गाझामधील इस्रायलच्या कारवाईविरोधात ते आवाज उठवत आहे. गाझामधील इस्रायलच्या कारवाईला त्यांनी नरसंहार म्हटले होते. यावर पॅलेस्टाईन शब्द आणि पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या टरबूजसारखे पॅलेस्टिनी चिन्ह देखील होते.
भाजपचा प्रियांका गांधींवर निशाणा :
मात्र, भाजपने या पॅलेस्टाईन बॅगबाबत प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर निशाणा साधत याला तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे. भाजप नेते आणि खासदार संबित पात्रा म्हणाले की, ‘गांधी कुटुंब नेहमीच तुष्टीकरणाची झोळी घेऊन आले आहे. नुकतेच नवी दिल्लीतील पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी अबेद एलराजेग अबू जझर यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली आणि वायनाड निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.





