Priyanka Gandhi on Modi। “मोदी जगभर फिरून मित्र बनवतात आणि मग आपल्याला…” ; ट्रम्पच्या टॅरिफ घोषणेववरून प्रियंका गांधींची सरकारवर टीका

Priyanka Gandhi on Modi। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशा परिस्थितीत, विरोधी पक्ष सर्व मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सर्वात जास्त चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील विधान आहे. त्यांच्या युध्दविरामाच्या वक्तव्याने काँग्रेस सतत पंतप्रधान मोदींकडून यावर उत्तर मागत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यानंतर वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी आज सभागृहात जाताना माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान, त्यांनी,”अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काय म्हटले हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी शुल्काबाबत काय म्हटले हे सर्वांना माहिती आहे.” असे म्हणत पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले.
#WATCH | Delhi: Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “Everybody has seen what the American President has said about tariffs, and he repeated that he stopped the war between India and Pakistan. India will have to respond to both issues. PM Modi goes everywhere, makes friends… pic.twitter.com/62e4MhxarW
— ANI (@ANI) July 31, 2025
सरकारला दोन्ही गोष्टींची उत्तरे द्यावी लागतील Priyanka Gandhi on Modi।
प्रियांका गांधी यांनी,”ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत विधान केले आहे की दोन्ही देशांनी माझ्या म्हणण्यावर युद्ध थांबवले आहे. ते पुढे म्हणाले की सरकारला दोन्ही गोष्टींची उत्तरे द्यावी लागतील. पंतप्रधान मोदी सर्वत्र जातात, जगभर प्रवास करतात. मित्र बनवतात आणि मग आपल्याला हे मिळते.” असे म्हणत त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ घोषांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
पवन खेडांकडून ट्रम्पची तुलना सापाशी Priyanka Gandhi on Modi।
तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी बुधवारी ट्रम्पची तुलना सापाशी केली. त्यांनी यावेळी,”ट्रम्प मोदींना सापासारखे वेढून बसले आहेत. तसेच राहुल गांधींनी त्यांना या गोंधळातून बाहेर पडण्याची उत्तम संधी दिली आहे. त्यांना फक्त एवढेच म्हणायचे होते की ट्रम्प युद्धबंदीबद्दल खोटे बोलत आहेत.” असे म्हणत पंतप्रधान मोदींवर त्यांनी टीका केली.





