Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये तिने पुरुषांना पत्नी शोधताना बॅचलरहुडवर लक्ष केंद्रित करू नका, असा सल्ला दिला असल्याचे म्हटले आहे. या व्हायरल पोस्टवर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण देत ही तिची पोस्ट नसल्याचे म्हणत मी असे काहीही म्हटले नसल्याचे प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रियांकाची फेक पोस्टमध्ये “कुमारी वधू शोधू नका. चांगल्या सवयी असलेली वधू शोधा. कारण कौमार्य एका रात्रीत संपते आणि चांगल्या सवयी कायम राहतात.” प्रियांका चोप्राने ही पोस्ट खोटी असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर तिने संताप देखील व्यक्त केला आहे. चुकीच्या पद्धतीने अॅानलाइन माध्यमाचा वापर करून खोटे दावे केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मीडियावर प्रियांकाची फेक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तिने याबाबत तिच्या चाहत्यांना अलर्ट करत सल्ला दिला आहे. इन्स्टा स्टोरीद्वारे तिने याबाबत सांगितले आहे. विचार व्यक्त केले. ‘हे माझे स्टेटमेंट नाही. फक्त ते ऑनलाइन आहे म्हणून ते ग्राह्य धरणे चुकीचे असल्याचे प्रियांका म्हणाली आहे. तसेच प्रियांका चोप्राने लोकांना सोशल मीडियावर गोष्टी पाहताना खूप काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक लिंक विश्वसनीय नसते. त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी ती तपासा. अशा प्रकारच्या कंटेंटवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला तिने दिला आहे. हेही वाचा : अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नंट? ‘लाफ्टर शेफ्स’ सीजन 2 च्या प्रोमोत नेमकं काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल