प्रियांका चोप्राच्या लेकीचा क्युट अंदाज; निकच्या कॉन्सर्टदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

Priyanka Chopra Daughter | अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय प्रियांका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. प्रियांका कायम लेक मालतीसोबतच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच निक जोनसने मालतीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
जोनस ब्रदर्सच्या एका कॉन्सर्टला मालती गेली तेव्हा ती आपल्या वडिलांचे कॉन्सर्ट खूप एन्जॉय करताना दिसली. या गोड क्षणाचा फोटो निकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. निक जोनस स्टेजवर उभा राहून परफॉर्मन्स देत होता. तेव्हा मालती आपल्या क्युट अंदाजात वडिलांना कॅमेरात कैद करताना दिसत आहे.
मालती कॅमेरामधून निकचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. निकने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. Priyanka Chopra Daughter |
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा अलिकडेच ‘हेड्स ऑफ स्टेट ‘ चित्रपटात पाहायला मिळाली. याशिवाय प्रियांका एसएस राजामौलीच्या SSMB29 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका साऊथ अभिनेता महेश बाबूसोबत झळकणार आहे. Priyanka Chopra Daughter |
हेही वाचा :
दादरच्या कबूतरखाना परिसरात आंदोलन; जैन समाज आक्रमक; पोलिसांसोबत जोरदार झटापटी





