जॉन सीनासोबत झळकणार प्रियांका चोप्रा ! ‘या’ चित्रपटात करणार एकत्र काम

मुंबई – बऱ्याच महिन्यांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडपासून काहीशी दूरच आहे. गेल्या वर्षभरामध्ये तर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारशी रुची देखील दाखवलेली नाही. सध्या ती तिच्या आगामी सिटाडेल या वेब सिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. अशात पीसीच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रियांकाने डब्लूडब्लूइ चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा प्रोजेक्ट साईन केला आहे.
प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर करत आगामी प्रोजेक्टबाबतची माहिती दिली आहे. प्रियांका आता जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करणार आहे. ‘हेड्स ऑफ स्टेट’ नावाच्या चित्रपटात प्रियांका जॉन सिनासोबत झळकणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट यावर्षी मे महिन्यात संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार आहे.
‘ऑन टू द नेक्स्ट’ या कॅप्शनखाली प्रियांकाने आपली पोस्ट शेअर केली आहे. यासोबत तिने जॉन सीना इद्रिस एल्बाला टॅग करत ‘लेट्स गो’ असं म्हंटल आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. खरं तर प्रियंकाने याआधी देखील हॉलिवूड स्टार्ससोबत काम केलं आहे. परंतु यावेळी ती डब्लूडब्लूइचा सुपरस्टार असलेल्या जॉन सिनासोबत दमदार ऍक्शन करताना दिसणार आहे. यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी अभिनेत्री भारतात देखील आली आहे.रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या सीरिजच्या प्रीमियरमध्ये प्रियांकासह तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेन होता. फॅन फॉलोविंगबाबत बोलायचे झाले तर प्रियांका भारतात पॉप्युलर असली तरी इतर देशांमध्ये तितकी प्रसिद्ध नाही. मात्र जॉन सीना वर्ल्ड वाईड चॅम्पियन असल्यामुळे त्याचे फॅन फॉलोविंग जगभर प्रचंड आहे. त्यामुळे आता प्रियांका जॉनची जोडी पडद्यावर कशी दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

