देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॅालिवूडमध्ये कमबॅक करणार? स्वतः केला खुलासा; म्हणाली “मी लवकरच…”

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या हॅालीवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन प्रियांका करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पार पडले.
प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळाला आहे. अशातच एका मुलाखती दरम्यान प्रियांकाने बॅालिवूड चित्रपटांची खूप आठवण येत असल्याचे विधान केले आहे. यामुळे आता ती लवकरच एका मोठ्या चित्रपटाद्वारे बॅालिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ हॉलीवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनेयाच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतीच एका मुलाखतीत तिने स्वतः कबूल केले की तिला बॉलिवूडची खूप आठवण येते आणि या वर्षी ती भारतात एका नवीन चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू करणार आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलतानाही प्रियांकाने, ‘मला हिंदी चित्रपटांची आणि भारताचीही खूप आठवण येते.’ असे म्हटले होते.
प्रियांका भारतात ज्या प्रोजेक्ट्सबद्दल उत्सुक आहे, त्यात सर्वात मोठे नाव म्हणजे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी चित्रपट एसएसएमबी २९ या चित्रपटाचे आहे. या मेगा बजेट चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन दिसणार असल्याची माहिती आहे.
हा एक पौराणिक थ्रिलर चित्रपट असणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगला या वर्षी ओडिशामध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रियांका फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : “तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील आणि उद्धव…”; नारायण राणे नेमकं काय म्हणाले?





