‘यांना कोणीतरी समजवा…’ प्रियांका निकच्या लिफ्टमधील रोमँटिक फोटोवर भडकले नेटकरी

मुंबई – प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे कपल बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक कृती चाहत्यांना आवडत असते. नुकतंच दोघेही भारतात येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी ऑटो रिक्षासोबत केलेलं फोटो शूट चांगलच चर्चेत आलं होत. आता देखील प्रियांका निकचे असेच काही रोमँटिक फोटो समोर आले आहेत.
प्रियांका निकने सिटाडेलच्या लंडन प्रीमियर शोला हजेरी लावली. यावेळी प्रियांका ऑफ-शोल्डर लाल गाऊनमध्ये दिसली. तर निक काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला. यावेळी हे कपल आपल्या मस्त मजाकीय अंदाजात दिसून आले.इतर कपलप्रमाणे निक प्रियांकाने देखील लिफ्टमधून जाताना फोटो काढले तर गॅलरीत रोमँटिक पोजमधे फोटोशूट केले. निकने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना, निकने इंस्टाग्रामवर प्रियांकाचे अभिनंदन केले तर सिटाडेलच्या शोसाठी आलेल्यांचे आभार देखील मानले आहेत. चाहत्यांनी मात्र प्रियंका निकचा हा अंदाज चांगलाच आवडला आहे. लिफ्टमध्ये रोमान्स करतानाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटच पाऊस पाडला आहे. बेस्ट कपल अशी कमेंट एकाने केली आहे तर दुसऱ्या एकाने मेड फॉर इच ऑदर असं म्हंटल आहे. यांना कोणी तरी समजवा… असं देखील एका युजरने म्हंटले आहे.
View this post on Instagram
सिटाडेल प्रीमियरसाठी प्रियांका निक व्यतिरिक्त रिचर्ड मॅडेन, तिची आई डॉ.मधु चोप्रा, वरुण धवन, समंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज आणि डीके यांच्यासह इंडस्ट्रीमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते, सिटाडेल ही प्रियांकाची दुसरी हॉलिवूड सिरीज आहे ज्यात ती एका गुप्तहेराची भूमिका करताना दिसणार आहे. याआधी प्रियांकाने क्वांटिकोमध्ये अशीच भूमिका साकारली आहे. ही सिरीज 28 एप्रिलला ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.





