‘नवीन चॅप्टरला सुरुवात…’, राजामौलींसोबत काम सुरु करण्याआधी प्रियंका चोप्राचे देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाली…

Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रियंका सध्या बॉलिवूडपासून लांब असली तरीही तिच्या कामाची नेहमीच चर्चा होत असते. सध्या प्रियंका हैदराबादमध्ये आहे. तिने हैदराबादमध्ये चिलकूर बालाजी मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले.
हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिराला भेट दिल्याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. देवाचे दर्शन घेत नवीन अध्यायाला सुरुवात करत असल्याचे प्रियंकाने म्हटले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, श्री बालाजींच्या आशीर्वादाने एका नवीन अध्यायाला सुरूवात करत आहे. आपल्या सर्वांना अंतःकरणात शांती लाभो आणि सर्वांना समृद्धी मिळो. देवाची कृपा अपार आहे. ॐ नमो नारायणाय.
View this post on Instagram
प्रियकांने तिच्या पोस्टमध्ये नवीन चॅप्टर सुरू करत असल्याचा उल्लेख केला आहे. याचा संदर्भात तिच्या आगामी चित्रपटाशी जोडला जात आहे. प्रियंका एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
प्रियंका SSMB29 या पॅन इंडिया चित्रपटात महेश बाबू आणि एसएस राजामौली यांच्यासोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटाद्वारे प्रियंका 23 वर्षांनंतर तेलुगू सिनेसृष्टीत पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रियंका महाकुंभमध्ये सहभागी झाल्याचीही चर्चा होती. मात्र, प्रियंकाने हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिराचे फोटो शेअर करत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले.





