Priyanka Chopra: अचानक मावशी आल्या आणि सगळं उघड झालं! प्रियंकाचा शाळेतील किस्सा
त्या वेळी प्रियांका अमेरिकेत तिची मावशी किरण यांच्याकडे राहत होती. आई-वडील कामानिमित्त दूर होते. शाळेत असतानाच तिला एका मुलावर क्रश आला. पुस्तकात तिने त्याचं खरं नाव न सांगता ‘बॉब’ असं नाव दिलं आहे. तो मुलगा १०वीत शिकत होता. तो मजेदार स्वभावाचा होता आणि प्रियांकाला लहानसहान गिफ्ट देत असे. दोघं शाळेत भेटायचे, बोलायचे. मात्र मावशींनी डेटिंगला परवानगी दिली नव्हती.

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने तिच्या ‘Unfinished’ या पुस्तकात बालपणीचा एक मजेशीर पण थोडासा घाबरवणारा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ती ९वी-१०वीत असताना घडला होता.
त्या वेळी प्रियांका अमेरिकेत तिची मावशी किरण यांच्याकडे राहत होती. आई-वडील कामानिमित्त दूर होते. शाळेत असतानाच तिला एका मुलावर क्रश आला. पुस्तकात तिने त्याचं खरं नाव न सांगता ‘बॉब’ असं नाव दिलं आहे. तो मुलगा १०वीत शिकत होता. तो मजेदार स्वभावाचा होता आणि प्रियांकाला लहानसहान गिफ्ट देत असे. दोघं शाळेत भेटायचे, बोलायचे. मात्र मावशींनी डेटिंगला परवानगी दिली नव्हती.

Priyanka Chopra
एके दिवशी मावशी बाहेर गेल्या असताना प्रियांकाने ‘बॉब’ला घरी बोलावलं. दोघं हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होते. हातात हात धरून गप्पा मारत होते. पहिल्यांदाच किस करण्याचा क्षण जवळ येत होता. पण तेवढ्यात प्रियांकाला खिडकीतून मावशींची गाडी दिसली. त्या अचानक परत आल्या होत्या.
घाबरून प्रियांकाने ‘बॉब’ला पटकन बेडरूममध्ये नेलं आणि अलमारीत लपवलं. “शांत बस!” असं सांगितलं. मावशी घरात आल्या आणि प्रियांकाला विचारू लागल्या की काय चाललंय. तिने सांगितलं की ती एकटीच आहे. पण मावशींना संशय आला. त्यांनी खोलीत येऊन थेट अलमारी उघडली.
Priyanka Chopra
अलमारीतून ‘बॉब’ बाहेर आला आणि सगळं प्रकरण उघड झालं. मावशींनी लगेच प्रियांकाच्या आईला फोन करून सांगितलं, “तिच्या अलमारीत एक मुलगा सापडला!” प्रियांका खूप घाबरली होती. तिचा पहिला किस करण्याचा प्लॅन पूर्णपणे फसला.
या घटनेनंतर मावशी आणखी कडक झाल्या. प्रियांकाला अभ्यासावर लक्ष द्यायला सांगितलं. त्या नात्याची मर्यादा शाळेपुरतीच राहिली. आज प्रियांका हा किस्सा हसत हसत सांगते, पण त्या वेळी मात्र तो क्षण तिच्यासाठी खूपच भीतीदायक होता.