Priyanka Chopra : बॅालिवूड इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॅालिवूडची वाट धरली. आता प्रियांका चोप्रा जगप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. निक जोनासशी लग्न केल्यापासून अमेरिकेत राहणारी प्रियांका तिच्या आगामी भारतीय सिनेमाच्या चित्रीकरणसाठी सोमवारी दिल्लीत दाखल झाली. प्रियांकाने सोशल मीडियावर ही अपडेट शेअर केली आहे. ती लवकरच एका मोठ्या भारतीय सिनेमामध्ये झळकणार असून या सिनेमाचे शूटिंग लवकरच पूर्ण होणार आहे. सोमवारी सकाळी प्रियांका राजधानी दिल्लीत दाखल झाली. दिल्लीत पोहचल्यानंतर तिने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये न्यू यॉर्कहून दिल्लीला पोहोचली, असल्याचे तिने म्हटले आहे. मायदेशी परतल्यानंतर अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. प्रियांका बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या एका मोठ्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे नाव ‘एसएसएमबी २९’ असून सिनेमाच्या शूटिंगसाठी ती दिल्लीत आली आहे. आता हे शूटिंग शेड्युल किती दिवसांचे असणार आणि नेमके कुठे होणार आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या सिनेमात दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेते महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचे चित्रीकरण पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले आहे. नुकतेच प्रियांका चोप्राच्या अनोख्या लूकची खूप चर्चा झाली होती. अलिकडेच प्रियांकाने निकसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला होता. तिला चाहत्यांसोबत कनेक्ट राहिला आवडते. त्यामुळे ती नियमितपणे तिच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेशनचे आणि सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘एसएसएमबी२९’ हा सिनेमा एस. एस. राजमौली यांचा मोठा सिनेमा असून, दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याच्याव्यतिरिक्त या सिनेमात आणखी कलाकार आहेत. मात्र, त्यांची नाव रिव्हील करण्यात आलेली नाहीत. या सिनेमात प्रियांकाच्या वाट्याला दमदार भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. पण अद्यापर्यंत तिची भूमिका काय आहे याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हेही वाचा : तुमची बँकांची कामं लवकर करून घ्या ! ऑक्टोबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद