Priyanka Chopra: हार्वर्डच्या मंचावर प्रियंका चोप्राचा दमदार संदेश; “तुम्हीच तो भारत आहात, ज्याचं मी स्वप्न पाहिलं!”
Priyanka Chopra प्रियंकाने आपल्या भाषणात “आपण ज्या भारताची कल्पना करतो, तो भारत कोणता?” या विषयावर विचार मांडले. सुरुवातीला हा विषय सोपा वाटला, पण समोर बसलेले तरुण विद्यार्थी पाहिल्यावर तिच्या मनात एकच भावना आली “तुम्हीच तो भारत आहात, ज्याची मी कल्पना केली होती.” तिच्या या वाक्याने संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Priyanka Chopra: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोपड़ा हिने नुकतेच अमेरिकेतील प्रतिष्ठित Harvard Business School येथे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण दिले. ‘इंडिया वीक’च्या समारोप कार्यक्रमात तिला प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात तिने भारतीय विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि त्यांना मोठी प्रेरणा दिली.
प्रियंकाने आपल्या भाषणात “आपण ज्या भारताची कल्पना करतो, तो भारत कोणता?” या विषयावर विचार मांडले. सुरुवातीला हा विषय सोपा वाटला, पण समोर बसलेले तरुण विद्यार्थी पाहिल्यावर तिच्या मनात एकच भावना आली “तुम्हीच तो भारत आहात, ज्याची मी कल्पना केली होती.” तिच्या या वाक्याने संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Priyanka Chopra
तिने आपल्या शालेय जीवनाच्या आठवणीही सांगितल्या. वयाच्या 12व्या वर्षी ती अमेरिकेतील आयोवा राज्यातील सीडर रॅपिड्स हायस्कूलमध्ये शिकायला गेली होती. त्यानंतर 90च्या दशकात ती मॅसॅच्युसेट्समधील न्यूटन नॉर्थ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. त्या काळात तिच्यासारखे दिसणारे विद्यार्थी खूप कमी होते. त्यामुळे कधी कधी तिला वेगळेपणाची जाणीव व्हायची. मात्र, आज 30 वर्षांनंतर हार्वर्डच्या मंचावर उभं राहून भारतीय विद्यार्थ्यांनी भरलेलं सभागृह पाहताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
प्रियंकाने विद्यार्थ्यांना सांगितले की, आपण सगळे आपल्या पालकांच्या आणि आधीच्या पिढ्यांच्या मेहनतीवर उभे आहोत. त्यांच्या त्यागामुळेच आज आपल्याला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नांसाठी धैर्याने पुढे जा. स्वतःचा सर्वोत्तम अवतार बनण्याचा प्रयत्न करा. यश मिळवताना इतरांबरोबरच स्वतःशीही दयाळू राहा, असा सल्ला तिने दिला.
View this post on Instagram
तिने आपल्या मुलीबद्दलही भावना व्यक्त केल्या. “माझ्या मुलीला भविष्यात तुमच्यासारखी प्रेरणादायी माणसं भेटतील, याचा मला आनंद आहे,” असे ती म्हणाली. तिच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. शेवटी तिने हार्वर्डमधील विद्यार्थ्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या पती आणि मुलीचे विशेष आभार मानत, “आज येथे उपस्थित राहणे माझ्यासाठी किती खास आहे, हे ते समजून घेतात,” असे ती म्हणाली. व्हॅलेंटाइन वीकेंडला हा खास क्षण अनुभवता आल्याचा आनंदही तिने व्यक्त केला.
प्रियंका चोप्राच्या या भाषणामुळे परदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तिच्या शब्दांतून तरुण पिढीला मोठं स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली.





