Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने शेअर केला परिणीतीचा लहानपणीचा फोटो; वाढदिवसानिमित्त दिल्या भावूक शुभेच्छा… म्हणाली, “या महिन्यात मिळालं अमूल्य भेट”

Priyanka Chopra: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपली बहिणी परिणीती चोप्राला वाढदिवसानिमित्त तिच्या लहानपणीच्या काही जुन्या छायाचित्रांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच परिणीती आई बनली असून या वाढदिवसाचा आनंद तिच्यासाठी अधिक खास ठरला आहे.
प्रियंकाने शेअर केले लाडक्या बहिणीचे फोटो
प्रियंका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर परिणीतीबरोबरचे काही जुने आणि बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे “हॅपी बर्थडे टीशा! या वाढदिवसाच्या महिन्यात तुला सर्वात मौल्यवान भेट मिळाली आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंद आणि प्रेमासाठी मी उत्सुक आहे.”
परिणीती आणि तिचे पती राघव चढ्ढा यांना नुकताच मुलगा झाला असून ही आनंदवार्ता दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती.
परिणीती चोप्राचा अभिनय प्रवास
परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने उत्साही आणि खोडकर ‘डिंपल चड्ढा’ची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम नवोदित अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
यानंतर ती ‘इश्कजादे’ (अर्जुन कपूरसोबत), ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘हंसी तो फंसी’, ‘गोलमाल अगेन’, ‘केसरी’ आणि ‘अमर सिंग चमकीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. ‘इश्कजादे’ चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला.
प्रियंका, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’ मध्ये दिसली होती. सध्या ती एस. एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘एसएसएमबी 29’ मध्ये काम करत असून या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियंकाने शेअर केलेले हे भावनिक फोटो आणि संदेश दोघी बहिणींच्या जिव्हाळ्याच्या नात्याचं सुंदर दर्शन घडवतात. परिणीतीसाठी हा वाढदिवस तिच्या मातृत्वामुळे अधिक खास ठरला आहे.





