प्रियंका चोप्रा झळकणार राजामौली यांच्या चित्रपटात, ‘या’ अभिनेत्यासोबत दिसणार प्रमुख भूमिकेत

Priyanka Chopra Next Movie : अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टीव्ही सीरिज आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात तिने हिंदी चित्रपटात काम केलेले नाही. त्यामुळे चाहते तिच्या बॉलिवूड चित्रपटातील पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. प्रियंका लवकरच एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे.
‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात प्रियंका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीसोबत दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमूख भूमिकेत असेल. एप्रिल 2025 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.
एसएस राजामौली या चित्रपटासाठी भारतासह जगभरात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यामुळे चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाची निवड केली असण्याची शक्यता आहे. सध्या राजामौली यांच्या आगामी चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. मात्र, सर्व सुरळीत पार पडल्यास हा चित्रपट वर्ष 2027 मध्ये रिलीज होऊ शकतो.
प्रियंका याआधी 2019 साली आलेल्या ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. याशिवाय, तिने नेटफ्लिक्सवरील द’ व्हाइट टायगर’ या चित्रपटातही प्रमूख भूमिका साकारली होती. हॉलिवूडमधील कामाबद्दल सांगायचे तर ‘सिटाडेल’ या प्राइम व्हीडिओ सीरिजमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.





