“आणखी किती करिअरला पूर्णविराम लावणार?” ; प्रियांका चतुर्वेदींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Priyanka Chaturvedi and PM Modi। देशातील UGC NET परीक्षेनंतर, आता NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने 25 जून ते 27 जून दरम्यान होणारी संयुक्त CSIR-UGC-NET परीक्षा जून-2024 पुढे ढकलण्याची घोषणा केलीय. दरम्यान, परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीवरून विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलल्याने शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी एक व्हिडिओ जारी करत केंद्रावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये, “एनटीएने पुढे ढकललेली ही तिसरी परीक्षा आहे. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते की, त्यांनी जबाबदारी घेतली आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्या दाव्याचे काय झाले?”असा सवाल त्यांनी केला.
“तुम्ही किती करिअरला पूर्णविराम द्याल”? Priyanka Chaturvedi and PM Modi।
पुढे बोलताना त्यांनी, “आज आमचे तरुण संतप्त आहेत, आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तुम्ही किती करिअरवर प्रश्न उपस्थित कराल, किती करिअरला पूर्णविराम द्याल? पंतप्रधानजी , देश तुमच्याकडे पाहतोय. तुम्ही या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगून आहात” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.
NTA काय म्हणाले?
दरम्यान, NTA ने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 25 ते 27 जून 2024 दरम्यान होणारी नियोजित संयुक्त CSIR NET परीक्षा अपरिहार्य परिस्थिती आणि लॉजिस्टिक समस्यांमुळे पुढे ढकलण्यात आलीय. सुधारित परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत वेबसाइट “csirnet.nta.ac.in” द्वारे घोषित केली जाणार आहे.
नेट परीक्षाही रद्द Priyanka Chaturvedi and PM Modi।
19 जून रोजी केंद्र सरकारने परीक्षेच्या अखंडतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत 18 जून रोजी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते. ते म्हणाले की, बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रतिष्ठित NEET परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आणि इतर अनियमिततेच्या आरोपांमुळे नेट परीक्षा रद्द करण्यात आली. या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली आणि अनेक उच्च न्यायालयांमध्ये तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या.





