Priyadarshini Indalkar: छाया कदम यांच्यासोबतचा फोटो शेअर करत प्रियदर्शिनीने व्यक्त केली भावना
Priyadarshini Indalkar: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'बंडखोर' सिनेमा छाया कदम आणि प्रियदर्शिनी एकत्र

Priyadarshini Indalkar: अभिनेत्री छाया कदम आणि प्रियदर्शिनी इंदलकर ‘बंडखोर’ या सिनेमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. या चित्रपटानंतर प्रियदर्शिनीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत छाया कदम यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियदर्शनीने छाया कदम यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो ‘बंडखोर’ सिनेमातील एका सीनमधील असून, त्यात छाया कदम यांना मिठी मारताना ती भावुक झाल्याचं दिसतं आहे. या सिनेमात आजी व नातीचे साकारलेल्या त्यांच्या पात्रांचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे.
छाया कदम यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत प्रियदर्शिनीने लिहिलं, “मी अशी छायाताईच्या मिठीत विरघळते. मला आजही आपला पहिला संवाद आठवतो. तू कमाल आहेस गं. तुझ्यासारखी सीनियर अभिनेत्री एका मैत्रिणीप्रमाणे बरोबर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे.”
View this post on Instagram
तिने पुढे असंही लिहिलं, “माझं कौतुक करण्यासाठी, मी योग्य मार्ग निवडतेय याची खात्री करून घेण्यासाठी थँक्यू.” प्रियदर्शिनीच्या या पोस्टवर छाया कदम यांनी कमेंट करत “तुझ्या या मिठीने मी खूप श्रीमंत झाले. यापुढे जसजसे तू एकेक मोठमोठे प्रोजेक्ट करशील, तसतशी माझ्या श्रीमंतीत वाढ होत जाईल. लव्ह यू.”, असे लिहिले आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा सिनेमा 24 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, तितिक्षा तावडेसह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा :
Educational App: सविंदणे विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅपची भेट





