बीपीसीएलचे खासगीकरण लांबणीवर
Updated On:

नवी दिल्ली – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीचे खासगीकरण करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. या कंपनीला खरेदी करण्यास फारशी उत्सुकता नसल्यामुळे हे खासगीकरण लांबणीवर पडणार आहे.
कोणत्याही बोली धारकाने आतापर्यंत या कंपनीला भेट दिलेली नाही. कंपनीतील सर्व 52 टक्के भागभांडवल केंद्र सरकार विकू इच्छित आहे. यासाठी तीन बोली आल्या होत्या. मात्र कोणीही कागदपत्रांची शहानिशा केलेली नाही. त्यामुळे वित्तीय बोलीची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही.
मध्यंतरी अनिल अग्रवाल संचलित वेदांत समुह यासाठी पुढाकार घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या समूहातील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मालमत्तेची पाहणी केली नाही. त्यामुळे मार्च महिन्यापूर्वी बीपीसीएलचे खासगीकरण होण्याची शक्यता कमी आहे. ही प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत लांबली जाऊ शकते.





