Private Schools। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील गरीब मुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सरकारने राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक भाषेतील खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. हा अंतिम प्रस्ताव नाही Private Schools। सरमा यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावावर जनतेचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला असून ही योजना पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा विचार केला जात असल्याचे सरमा यांनी म्हटले. त्यासोबतच ‘हा अंतिम प्रस्ताव नाही. आम्ही संकल्पना मंजूर केली आहे आणि आता लोकांचे मत जाणून घेत आहोत. सर्व काही सुरळीत राहिल्यास पुढील वर्षापासून ही योजना राबवू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. योजना इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी नाही Private Schools। सरमा म्हणाले की, सरकार आरक्षित विद्यार्थ्यांच्या 25 टक्के शुल्क शाळांना परत करेल, ज्यांना या योजनेत सामील होण्यासाठी शिक्षण विभागाकडे अर्ज करावा लागेल. तसेच कमी उत्पन्न गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी शाळा स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतील. ही योजना केवळ आसामी, बोडो आणि बंगाली यासह नामांकित प्रादेशिक भाषांच्या शाळांना लागू होईल, परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू होणार नाही. याशिवाय आसाम मंत्रिमंडळाने इतरही अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. 5 लाखांपर्यंत वार्षिक कर मागणी असलेल्या छोट्या व्यवसायांना आता GST नोटिसमधून सूट दिली जाईल, ज्यामुळे सुमारे 90,000 व्यवसायांना दिलासा मिळेल. मंत्रिमंडळाने गणित विषयासाठी 1,766 पदवीधर शिक्षक पदांना आणि बोडो कराराच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राच्या जिल्ह्यांमधील आणखी 19 गावांचा समावेश करण्यास मान्यता दिली. हेही वाचा Paris Olympics 2024 : भारताचा पदकांचा षटकार..! कुस्तीपटू अमन सेहरावतला 57 किलो वजनी गटात कांस्य…