आज नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थित होणार महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यभर सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. याठिकाणी पंतप्रधानांची जाहीर सभा देखील होणार आहे. पंचवटीतील तपोवनात मोदींची ही जाहीर सभा होणार असून सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे बुधवारी सायंकाळी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेला तिहेरी कवच प्राप्त झाले आहे. राज्यातील भाजपच्या प्रचाराची सुरुवातच नाशिकमधून होणार असल्याने मोदी आणि फडणवीस यांच्याकडून राज्यासाठी मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्‍यता आहे. पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा या सभेत होण्याची शक्‍यता भाजपच्या गोटातून वर्तवली जात आहे. नाशिकमधील मोदींच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, भाजपचे मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.