राममंदिर उभारणी समितीच्या अध्यक्षपदी नृपेंद्र मिश्रा
Updated On:

नवी दिल्ली : रामजन्मभूमी ट्रस्टच्या नियोजित राममंदिर उभारणी समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली. राममंदीर ट्रस्ट या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी निर्माण केलेल्या ट्रस्टच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्य गोपाल दास यांची निवड करण्यात आली तरव चंपत राय यांची ट्रस्टच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. ट्रस्टची बैठक ट्रस्टचे प्रमुख के परासरन यांच्या निवासस्थानी झाली.
राममंदिर उभारण्याची तारीख ट्रस्टकडून लवकरच ठरवण्यात येणार आहे. हा ट्रस्ट नरेंद्र मोदी सरकारने उभारला होता. त्याची घोषणा पाच फेब्रुवारीला करण्यात आली होती.
टॅग्स:





