पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंपाई सोरेन यांची केली विचारपूस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सोरेन यांना रक्तातील साखरेच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे चक्कर आल्याने सोरेन यांना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जमशेदपूर येथील टाटा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी चंपाई सोरेन यांना फोन करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, असे माजी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले. फोन केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानताना, सोरेन यांनी सांगितले की त्यांना खूप बरे वाटत आहे आणि लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी आशा व्यक्त केली होती.
देव आणि पूर्वजांच्या कृपेने, डॉक्टरांचे अथक परिश्रम आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादाने मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार!असे ट्वीट त्यांनी रूग्णालयातून घरी सोडल्यानंतर केले. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि अन्य नेत्यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मरांग बुरुची (सर्वोच्च आदिवासी देवता) चंपाई दा यांना लवकर बरे करण्यासाठी मी प्रार्थना करतो. मी त्यांना दीर्घायुष्यासाठीही कामना करतो, असे हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.





