Paris Olympics 2024 : पंतप्रधान मोदींची ऑलिम्पिक पथकाशी चर्चा, खेळाडूंना दिला विजयाचा मंत्र…

नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडू रवाना होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी त्यांच्याशी खास भेट घेतली आणि त्यांना विजयाचा मंत्र दिला. यादरम्यान, पंतप्रधानांनी खेळाडूंना 2036 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाची भारताची बोली यशस्वी होण्यासाठी पॅरिसमधील व्यवस्थेचा अनुभव शेअर करण्याचे आवाहन केले.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंशी वैयक्तिक आणि ऑनलाइन संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी सामायिक केलेली माहिती 2036 ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा दावा मजबूत करण्यास मदत करेल. पंतप्रधान म्हणाले, “2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यामुळे आणखी मोठे वातावरण निर्माण होईल आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. तज्ञ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करत आहेत.”
ते म्हणाले, “मी तुम्हाला ऑलिम्पिकपूर्वी नव्हे तर नंतर तेथील व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगेन. खेळांनंतर तेथे काय व्यवस्था आहेत हेही तुम्ही पाहावे. खेळाडूंकडून मिळालेले इनपुट 2036 साठी उपयुक्त ठरेल. हे पाहून तुम्ही आलात तर आमच्यासाठी खूप सोयीस्कर होईल.”
Interacted with our contingent heading to Paris for the @Olympics. I am confident our athletes will give their best and make India proud. Their life journeys and success give hope to 140 crore Indians. pic.twitter.com/OOoipJpfUb
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2024
क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांच्यासोबत भारतीय खेळाडूंचा ताफाही यावेळी हजर होता. मोदींनी नीरज चोप्रा, बॉक्सर निखत झरीन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांच्याशी आभासी संभाषण केले.
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर खेळाडूंना संबोधित करताना मोदी म्हणाले, मला विश्वास आहे की खेळाडू त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करतील. ते त्यांचे सर्वोत्तम देऊन भारताचा गौरव वाढविताना आपल्या कामगिरीने 140 कोटी देशवासियांना अभिमानीत करतील. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॉक्सर निखत जरीनसह अनेक नेमबाजांशी मोदींनी संवाद साधला आणि त्यांच्या तयारीची माहिती घेतली.
यावेळी बोलताना पी.व्ही. सिंधू म्हणाली की, हे माझे तिसरे ऑलिम्पिक आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. टोकियोमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्यामुळे यावेळी मला पदकाचा रंग बदलून परतायचे आहे. तसेच तिने यावेळी अन्य खेळाडूंना स्पर्धेचा दबाव न घेता आपले १०० टक्के देण्याचे आवाहन केले.
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राकडे मोठी जबाबदारी…
यावेळी मोदींनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला चुरमा खाऊ घालण्यास देखील सांगितले. गेल्या वेळी, टोकियो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर खेळाडूंचे स्वागत करताना, मोदींनी त्यांच्या निवासस्थानी नीरजला चुरमा आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला आईस्क्रीम दिले होते.
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाली आहे. ज्यामध्ये नीरज चोप्राच्या भालाफेकमधील ऐतिहासिक सुवर्णासह सात पदके जिंकली आहेत, भारतातील 100 हून अधिक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत, त्यापैकी 21 नेमबाज आहेत.





