पंतप्रधान मोदी कुवेतमध्ये म्हणाले,”मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो माझं कुटुंब 140 कोटी जनतेचं…”

Prime Minister Narendra Modi in Kuwait। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कुवेत दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी भारतीय कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमचे शेतकरी आणि मजूर खूप मेहनत करतात, जेव्हा मी त्यांना काम करताना पाहतो तेव्हा मला वाटते की ते 10 तास काम करतात तर मी 11 तास काम केले पाहिजे. त्यांनी 11 तास काम केले तर मी 12 तास काम केले पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मेहनत करा, मीही माझ्या कुटुंबासाठी काम करतो, माझ्या कुटुंबात 140 कोटी लोक आहेत, त्यामुळे मला आणखी काम करावे लागेल.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
तुम्ही वैद्यकीय रजा घेता का? या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी देशातील शेतकरी कामगारांचे उदाहर दिले. यावेळी बोलताना त्यांनी,”कामगारांच्या घामाचा सुवास हेच माझे औषध आहे. तसेच भारतातील नवीन इंटरनेटविषयी,” मी प्रत्येक घरात आवश्यक सुविधा पुरवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मी 140 कोटी लोकांसाठी कठोर परिश्रम करत आहे. या दरम्यान पीएम मोदी म्हणाले की, भारतात सर्वात स्वस्त डेटा (इंटरनेट) आहे आणि जर आपल्याला जगभरात किंवा भारतात कुठेही ऑनलाइन बोलायचे असेल तर त्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करत असला तरी खर्च खूपच कमी असतो. लोकांसाठी ही एक मोठी सोय आहे, ते दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतात. याचा मला आनंद आहे असे त्यांनी म्हटले.
पीएम मोदींनी विकासाचा अर्थ सांगितला Prime Minister Narendra Modi in Kuwait।
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पीएम मोदी म्हणाले की, “माझ्यासाठी विकास हा फक्त चांगले रस्ते, विमानतळ, रेल्वे स्टेशन एवढा मर्यादित नाही, मला अगदी गरीबातल्या गरीबांच्या घरातही शौचालये बांधायची आहेत, आतापर्यंत आम्ही 11 कोटी शौचालये बांधली आहेत. गरिबांना कायमस्वरूपी घरे असावीत असे माझे मत आहे, आतापर्यंत ४ कोटी कायमस्वरूपी घरे बांधून गरिबांना दिली आहेत. पण अजून खूप काही करायचे आहे. रेल्वे, रस्ते आणि विमानतळ आवश्यक आहेत, पण माझ्यासाठी माझ्या गरिबांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. प्रत्येकाला सर्व सामान्य गरजा मिळायला हव्यात, त्याने कुणासमोर हात पसरू नये.”अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi visited Gulf Spic Labour Camp and interacted with Indian workers, in Kuwait yesterday.
PM Modi, says “India has the cheapest data (internet) and if we want to talk online anywhere in the world or even in India, then the cost is much less.… pic.twitter.com/bAq5b01QTF
— ANI (@ANI) December 22, 2024
‘भारताच्या कर्मचाऱ्यांची जगभरात प्रतिष्ठा’ Prime Minister Narendra Modi in Kuwait।
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,”आज भारत जी प्रगती करत आहे त्यात तुमचाही वाटा आहे, “असे म्हणाले. “तुम्ही कुठेही असाल, तुमच्या घामाने कमावलेला पैसा तिथे पोहोचतो आणि देशाच्या प्रगतीत भर घालतो.” ते म्हणाले की, “भारतातील एक पंतप्रधान 40 वर्षांनंतर कुवेतला आला असून,याठिकाणी येऊन आपल्या कामगार बांधवांना भेटत आहे. भारतीय कर्मचाऱ्यांची जगभरात मोठी प्रतिष्ठा आहे, तुम्ही काम करून जो सन्मान मिळवला आहे त्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास निर्माण झाला आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा
आसाममध्ये २४ तासांत ४१६ जणांना अटक ; नेमकं काय आहे कारण ? वाचा





