पंतप्रधानांचे शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी ८ राज्यांमधल्या मतदारांना आवाहन ; म्हणाले…

Prime Minister Narendra Modi । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी ८ राज्यांमधल्या मतदारांना आवाहन केले आहे.
PM Narendra Modi tweets, “Today is the final phase of the 2024 Lok Sabha elections…I hope young and women voters exercise their franchise in record numbers. Together, let’s make our democracy more vibrant and participative.”#LokSabhaElections2024 pic.twitter.com/WVGW5CJaFl
— ANI (@ANI) June 1, 2024
विक्रमी संख्येने मतदान करा Prime Minister Narendra Modi ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मतदारांना आवाहन केले. यावेळी त्यांनी मतदारांना मागच्या टप्प्यातील मतदानापेक्षा विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “आज लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटचा टप्पा आहे. मला आशा आहे की तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावतील. आपण मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी बनवूया.” असे म्हटले आहे.
उमेदवारांपैकी केवळ 95 उमेदवार महिला loksabha Phase 7 Voting ।
निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या १३, पंजाबच्या १३, झारखंडच्या सहा, ओडिशाच्या सहा, हिमाचल प्रदेशच्या चार, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारच्या एका आणि चंदीगडच्या एका जागेवर मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 904 उमेदवारांपैकी केवळ 95 उमेदवार महिला आहेत. पंजाबमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील 328 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.





