‘बजेटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी त्या करोडपतींना मदत करतील’

budget 2024 । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आज म्हणजेच 23 जुलै रोजी संसदेत सादर करत आहे. या अर्थसंकल्पाबाबत सर्व प्रकारचे अटकळ बांधले जात आहे. अशात काँग्रेस नेत्यांकडून या अर्थसंकल्पावरून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
‘बजेटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी त्या करोडपतींना मदत करतील, जे त्यांचे निकटवर्तीय आहेत. मध्यम वर्ग आणि प्रामाणिक करदात्यांना पोकळ आश्वासनांशिवाय काही मिळणार नाही’ असं काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले.
दरम्यान, सर्वसामान्यांपासून ते विद्यार्थी, शेतकरी, करदाते आणि उद्योगपतींना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने स्पष्ट केले आहे की, यंदाच्या अर्थसंकल्पात भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून सादर करण्यावर भर असेल.
हा अर्थसंकल्प भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा रोड मॅप ठरेल, असे मानले जात आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याची ब्लू प्रिंट असेल बजेटमध्ये काही क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात.





