“पंतप्रधान मोदी एक महान मित्र…”; डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक करत दिला टॅरिफबाबत इशारा

US President Donald Trump on PM Modi | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या हाई टॅरिफ पॉलिसीबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. मात्र त्यासोबतच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना एक महान मित्र आणि ‘अतिशय स्मार्ट व्यक्ती’ म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील व्यवसाय चर्चा सकारात्मक परिणाम करतील, असा विश्वासही व्यक्त केला.
“पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला आले होते. आम्ही नेहमीपासून खूप चांगले मित्र आहोत. आमच्यात खूप चांगले संभाषण झाले. पंतप्रधान मोदी खूप हुशार व्यक्ती आणि माझे चांगले मित्र आहेत. मला वाटते की यामुळे भारत आणि आमच्या देशामध्ये खूप चांगले परिणाम होतील. तुमच्याकडे एक अप्रतिम पंतप्रधान आहेत, ते खूप स्मार्ट आहेत.” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी एकच समस्या आहे की भारत जगातील सर्वात जास्त टॅरिफ असलेल्या देशांपैकी एक आहे, असेही म्हंटले आहे.
#WATCH | Washington, US: On India-US tariff talks, US President Donald Trump says, “Prime Minister Modi was here just recently, and we’ve always been very good friends. India is one of the highest tariffing nations in the world… They’re very smart. He (PM Modi) is a very smart… pic.twitter.com/7O4adE7F9f
— ANI (@ANI) March 28, 2025
ट्रम्प यांचा टॅरिफबाबत भारताला इशारा
अमेरिका २ एप्रिलपासून अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. “माझे भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत, पण माझी एकच अडचण आहे की ते जगातील सर्वात जास्त टॅरिफ आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला वाटते की ते कदाचित ते दर मोठ्या प्रमाणात कमी करतील, पण २ एप्रिल रोजी आम्ही त्यांच्यावर तेच शुल्क आकारू जे ते आमच्याकडून आकारतात,” असंही ट्रम्प म्हणाले. US President Donald Trump on PM Modi |
दरम्यान, ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर सातत्याने टीका केली असून देशाला ‘टॅरिफ किंग’ म्हटलं आहे. तसेच अमेरिका भारतासह त्या देशांवर टॅरिफ लावण्याची तयारी करत आहे, कारण ट्रम्प यांनी हे अन्यायकारक व्यापार पद्धती म्हणून वर्णन केले आहे. याद्वारे ट्रम्प प्रशासनाकडून भारतीय वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्याचा दबाव कायम असल्याचे दिसत आहे. US President Donald Trump on PM Modi |
हेही वाचा:





