Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी शुभांशु शुक्लांना दिला खास गृहपाठ; काय म्हणाले? एकदा पाहाच…

Shubhanshu Shukla | Narendra Modi : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेल्या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी शुभांशू शुक्ला यांना गृहपाठही दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘माझी सवय आहे की जेव्हा-जेव्हा मी कोणाला भेटतो तेव्हा त्यांना गृहपाठही देतो. पंतप्रधान मोदींनी शुभांशू यांना सांगितले की, तुमचा गृहपाठ असा आहे की, ‘तुम्हाला मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे आपण गगनयान पुढे नेऊन चंद्रावर उतरवायचे आहे’.
यावर शुभांशूने सांगितले की, मला येथे मिळणारे अनुभव खूप मौल्यवान आहेत. मी परत आल्यावर गगनयानसह इतर मोहिमा पुढे नेण्यासाठी मी नक्कीच काम करेन. शुभांशूने सांगितले की, अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेले अंतराळवीरही गगनयानबद्दल उत्सुक आहेत. आपण गगनयान कधी जाऊ शकतो असे त्यांनी विचारले तेव्हा मला आनंद झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजची मुले फक्त आकाशाकडे पाहत नाहीत, तर त्यांना वाटते की मीही तिथे पोहोचू शकतो. ही भावना आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमेचा पाया आहे.
शुभांशू म्हणाले की, आजचा भारत ज्या दिशेने जात आहे, त्यात खूप धाडसी आणि मोठी स्वप्ने पाहिली आहेत. यशाचा कोणताही एक मार्ग नाही, परंतु प्रत्येकामध्ये सामान्य गोष्ट म्हणजे आशा सोडू नये. प्रयत्न करत राहिले पाहिजे. यश नक्कीच मिळेल. असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी शुभांशूला सांगितले की, आम्ही सर्वजण तुमच्या परतण्याची वाट पाहत आहोत. स्वतःची काळजी घ्या, भारतमातेचा आदर वाढवत रहा. १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. पंतप्रधान मोदींनी भारत माता की जय म्हणत संभाषणाचा समारोप केला. शुभांशूनेही प्रत्युत्तरात भारत माता की जय म्हटले.





